NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

`ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पाला मिळणार गती

`ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पाला मिळणार गती

ठाणे – ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’च्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आज मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खासदार नरेश म्हस्के यांनी बैठक घेतली. बैठकीत २०२९ पर्यंतठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी दिली आहे.

ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी तक्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देऊन भरीव निधी मंजूर केला. नुकत्याच दिल्लीत झालेल्या नगर विकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत नरेश म्हस्के यांनी कामाला गती मिळावी यासाठी मुद्दा उपस्थित केला होता.

आज खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी, मुख्य प्रकल्प अधिकारी सुनिलकुमार गर्ग, व्यवस्थापक प्रविण पापोळकर यांच्या समवेत कामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली व प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. विविध सूचनाही करण्यात येऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

१२ हजार २०० कोटींची मंजूरी असलेल्या हा अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्प २९ कि.मी. लांबीचा आहे. २६ कि.मी. जमिनीवरून तर 3 कि.मी. जमिनी खालून (भूमिगत) ही रेल्वे धावणार आहे. याच्या मार्गिका अंतिम करण्यात आल्या आहेत. एकूण २२ स्थानके उन्नत तर २ स्थानके भूमिगत असणार आहेत. भूमिगत असलेली स्थानके ही जुने ठाणे रेल्वे स्थानक आणि नवीन ठाणे रेल्वे स्थानक यांना जोडणारी असणार आहे. भूमिगत रेल्वे प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते.

भूमिगत रेल्वेमुळे कोणत्याही इमारती अथवा बांधकामांस बाधा किंवा अडचण निर्माण होणार नसल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील रायलादेवी ते बाळकूम नाका या २० किलोमीटर लांबीच्या कामासाठी १४०० रुपये कोटी रुपयांची निविदा मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती खासदार म्हस्के यांनी दिली आहे.

ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पामध्ये वागळे इस्टेट, रोड नं. 22, लोकमान्य नगर, पोखरण रोड नं.1, पोखरण रोड नं.2, ग्लॅडी अल्वारिस रोड, हिरानंदानी मिडोज, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, बाळकुम, राबोडी, ठाणा कॉलेज रोड, ठाणे स्टेशन या परिसरातून ही अंतर्गत मेट्रो धावणार आहे. सीआरझेडच्या अडचणीमुळे बाळकुम नाका ते रायलादेवी मार्गाची निविदा 3 महिन्यांनी निघणार आहे. वडवली, कावेसर येथेठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पाच्या डेपोचे सर्व्हेक्षण सुरु आहे.

लोकांच्या काही तक्रारी असून त्या दूर करुन डेपो बांधणीच्या कामाची निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ ची स्थानके अत्याधुनिक आणि आयॉनिक करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार ही स्थानके बांधण्याकरता नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी काही सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

डिसेंबर २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. काम सुरु असतांना विविध शासनाचे विभाग, ठाणे महापालिका, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारण, महानगर गॅस, महावितरण या संदर्भातील अडचणींवर मात करण्याकरता सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. `ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ कामाचे लवकरच भूमिपुजन करण्यात येऊन ठाणेकर जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक चांगली भेट देणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बदलते ठाणे’ अंतर्गत विविध प्रकल्प ठाण्यात पूर्णत्वास येत आहेत.ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’ प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची मुक्तता होणार असून वेळेची बचत होणार आहे. पर्यावरणाचेही या प्रकल्पामुळे रक्षण होणार असून ठाणेकरांच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट